100% FREE Shipping all across India

Navratri Ghatasthapana – a classical farming culture

Navratri Ghatasthapana – a classical farming culture

नवरात्रौत्सव :

देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते. हिंदु संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे, तितकेच देवीलाही आहे, हे विशेषत्वाने. पंचायतन पूजेमध्ये शिव, विष्णु, गणपति आणि सूर्य यांसमवेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे.
सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य,संयम ,उपासना,यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो.म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले.नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.यामुळे आपल्या नवीन शक्ती,नवा उत्साह,उमेद निर्माण होत असते.बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणा-या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.
हिंदु धर्मामध्ये सर्वच उत्सव वेगवेगळया पध्दतीने आणि प्रकाराने साजरे केले जातात. देवीने नऊ रात्रीचे नऊ दिवस भीषण युध्द करुन अनेक दैत्यांचा संहार केला आणि महिषासुराचा वध केला.म्हणून महिषासूरमर्दिनीच्या शक्तीरुपाची नवरात्रीत उपासना केली जाते. नवरात्रीत देवीच्या विविध रुपांत पुजा करुन आराधना केली जाते. नऊ दिवस उपवास ठेवण्यात येतात. उपवास याचा अर्थ दूर जाणे- मनोविकार, पापवासना आणि दुष्टबुध्दी या विकारापासून दूर जाणे या व्यापक अर्थाने नवरात्रीचे उपवासाचे महत्व आहे.
आपल्या हिंदुसंस्कृतीत एका वर्षात पाच प्रकारच्या नवरात्री येतात.

1) शारदीय नवरात्र, शरद ‘ऋतुत (सप्टेंबर/ऑक्टोबर)
2) वासंतिक नवरात्र , वसंत ऋतुत म्हणजेच चैत्र शुध्द प्रतिपदा ते चैत्र नवमी (मार्च/एप्रिल)
3) शाकंभरी नवरात्र , माघ शुक्ल अष्टमी ते माघ पौर्णिमा (जानेवारी/फेब्रुवारी)
4) गुप्त नवरात्र किंवा वराही नवरात्र, आषाढ शुध्द प्रतिपदा ते आषाढ शुध्द नवमी ( जून/जुलै)
5) चंपाषष्ठीचे नवरात्र , मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुध्द षष्ठी असे सहा दिवसांचे एकमेव नवरात्र (नोव्हेंबर/डिसेंबर)

या सर्व नवरात्रींपैकी आश्विन शुध्द प्रतिपदा ते आश्विन शुध्द नवमी या काळात येणा-या शारदीय नवरात्रौत्सव भक्तांमध्ये महत्वाचे मानले जाते. आश्विन शुध्द प्रतिपदेला घरांघरांमध्ये घटस्थापना केली जाते आणि देवीचा उत्सवाला सुरुवात होते. घटस्थापना म्हणजे काय तर एका पत्रावळीवर माती पसरवुन मधोमध मातीचा छोटा घडा ठेवला जातो. त्या मातीमध्ये सप्तधान्य पेरुन मातीच्या घटामध्ये पाणी भरले जाते. त्यास बंदिस्त जागी ठेवून अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. तो नंदादीप अखंडपणे नऊ दिवस सतत तेवत रहावा म्हणून दगडाचा अथवा धातूचा मोठा दिवा आवर्जून घेण्यात येतो आणि त्याची वात नऊ दिवस तेवत राहील अशी मोठी ठेवण्यात येते जेणेकरुन घटाजवळचा नंदादीप अखंडपणे तेवत राहील आणि देवीचा जागर होत राहील. दररोज घटाला फुलांची माळ घातली जाते, सकाळ संध्याकाळ आरती म्हटली जाते आणि ज्यांना शक्य आहे त्यांचेकडे सप्तशतीपाठ,श्रीसुक्त,ललिता सहस्त्रनामावली चे वाचन मनन,कुलदेवतेचा जप केला जातो.

घटस्थापना ही जरी पारंपारिक पध्दतीने केली जात असली तरी त्यामागे शास्त्रीय कृषक संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. ही एक बीजपरीक्षण, पाणी परीक्षण, माती परीक्षण, आणि हवामान परीक्षणाची पारंपारिक परंतु शास्त्रीय दृष्टीकोन असणारी पध्द्ती आहे.

घट्स्थापना करतो म्हणजे आम्ही नक्की काय करतो?

प्रथमत: एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारची बियाणे मिसळली जातात. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी तळी उचलुन घटाचे विसर्जन केले जाते.
यामागील शास्त्रीय दृष्टीकोन पाहिल्यास, घट स्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्या आधी केली जाते. घटा साठी वापरण्यात येणारी माती ही शेतातील काळी माती वापरली जाते. परंतु ही माती इतर कोणाच्या शेतातील घेतली जात नाही तर शेतकरी आपल्याच शेतातील किंबहुना ज्या शेतात तो रब्बी पिक घेणार आहे त्याच शेतातील माती वापरली जाते. कारण ज्या शेतात तो पिक घेणार आहे त्या शेतातील मातीचे हे परीक्षण असते.
या मातीत मिसळलेले बियाणे हे कोणतेही बियाणे वापरले जात नाही तर रब्बी हंगामात जे पिक शेतकरी त्याच्या शेतात पेरु शकतो तेच आणि त्याच्याकडे उपलब्ध असणारे बियाणेच शेतात टाकले जाते. त्या मागचा हेतु त्याच्या शेतात वापरले जाणा-या बियाणाची उगवण क्षमता किती आहे हे तपासणे असते.
घटामध्ये नऊ दिवस जे पाणी घातले जाते ते शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरणार आहे त्याच जलस्त्रोत्राचे पाणी घटामध्ये घातले जाते. घट हा मातीचा आणी कच्चा भाजलेलाच वापरला जातो. तो इतर कोणत्याही धातुचा वापरत नाहीत. कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरणे आवश्यक असते जेणे करुन त्याच्या खाली शंकु आकारात ठेवलेल्या मातीत आणि त्यात टाकलेल्या बियांना रुजण्यासाठी त्याची उपलब्धता होते. आपल्याकडे घट नऊ दिवसच बसवले जातात त्यामागे बियांना रुजुन अंकुर बाहेर पडण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागतो हे आहे.

घटामधील बियाणांची उगवणक्षमता रोज तपासली जाते. नवव्या दिवशी गावातील पाच,सात किंवा अकरा जाणत्या व्यक्तिंकडून तळी उचलली जाते. तळी म्हणजे एका ताटात खोबरे , भंडारा आणि घटात तरारुन आलेले धान घेतात आणि सदानंदाचा येळकोट,भैरवनाथाचं चांगभले,अंबाबाईचा उदो उदो असे उच्च आवाजात बोलतात. यामागे घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पहाणी करण्याचा उद्देश तर आहेच परंतु शास्त्रीय दृष्टी अशी की, जे पीक जोमाने आले आहे ते पिक शेतात पेरण्यासाठी सर्वानुमते निवडण्याची प्रक्रियाही आहे. या सर्वानुमते घेतलेल्या निर्णयाला चांगभल, येळकोट अशा घोषणा देवून सर्वांची मान्यता दिली जाते.
सर्वमान्य असलेले पिक उदो उदो करुन उपटले जाते. या उपटलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपी किंवा फेट्याच्या शिरपेचात खोचतो किंवा त्याची अंगठी करुन हातातही बांधली जाते. शिलंगणाला किंवा सोने लुटणे (म्हणजे आपटयाची पाने एकमेकांना वाटणे ) यासाठी गावाच्या वेशीबाहेरील एखादया पुरातन देवळात सर्व जमून वाजतगाजत गावात येतात. या पध्दतीमुळे घरोघरी घेण्यात आलेल्या परीक्षणाचे निकाल एकत्र करुन अभ्यासणे सोपे जाते. गावातील सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून त्याच दिवशी गाव शिवारातील पीक पाण्याचे नियोजन केले जाते. या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणि बीज परीक्षण जसे होते त्याच बरोबर या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे याचे पण परीक्षण केले जाते.
रब्बी हंगामात घ्यावयाचे पीक निश्चित झाल्यानंतर दसरा सण हा मोठया उत्साहाने साजरा केला जातो. आगामी रब्बी हंगामात सर्वांनाच आपल्या शेतात कोणते पीक घ्यावे त्यासाठी पाण्याचे प्रमाण किती , ते पीक कसे येईल याचा अंदाज बांधण्यासाठी घटस्थापना करण्यामागील संकल्पना किती उदात्त होती हे यावरुन लक्षात येते.

माझ्या शेताच्या मातीत, माझ्याकडे उपलब्ध असलेले बियाणे , माझ्या शेताला उपलब्ध असलेल्या पाण्यावर , या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे या सर्वांची चिकित्सा करुन जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी वापरण्यात येणारी पारंपारीक परंतु शास्त्रावर आधारलेल्या या चिकित्सा पध्दतीची जोपासणा शास्त्रीय पध्दतीने जोपासणे गरजेचे आहे.
आपल्या हिंदू धर्मातील प्रथा परंपरा या उगाचच नाहीत तर त्या प्रत्येक प्रथा परंपरेमागे शास्त्रीय चिकित्सेचा दृष्टीकोन होता. आधुनिक काळातील चिकित्सेपेक्षा नैसर्गिकपणे चिकित्सा करुन सर्वानुमते चांगले पीक निवडून त्याची लागवड करण्याची ही भूमिका कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशासाठी समृध्द वारसा असल्याची जाणीव या निमित्ताने होणे गरजेचे आहे.

Navratri:
The tradition of worshiping the Goddess has been going on in India for a long time. Although the original form of the Goddess is Nirguna, the tradition of worshiping her Saguna form is prevalent in India. Various Saguna forms of the Goddess are worshiped in the form of Kuldevi, Gram Devi, Shakti Peeth etc. In Hindu culture, Goddess is as important as God, especially. In Panchayat Puja, along with Shiva, Vishnu, Ganapati and Surya, the worship of Goddess is also of special importance.

Transformation in creation is a game of power. Brahmacharya, Restraint, Upasana, Yadnya increase the body’s immune system. Memory improves and intellectual development takes place. Therefore, Navratra is considered to be a time of physical and spiritual purity. The deity was deified by the deification of the powers in the place of all the deities, and the Shakti-like idol got the name Devi, and the Shakta sect praised her as the supreme deity, Adimaya, or Jagdamba. Navratri is a time of seasonal change. It creates new energy, new enthusiasm, hope.

In Hindu Dharma, all festivals are celebrated in different ways and in different types. The goddess fought a fierce battle for nine days and nights, killing many demons and killing Mahishasura. Therefore, the power of Mahishasuramardini is worshiped on Navratri. Goddess is worshiped in various forms on Navratri. Nine days are fasted. Fasting means getting rid of – the importance of Navratri fasting in the broadest sense is to get rid of mental disorders, lust and evil.

In our Hindu culture, there are five types of Navratri in a year.
1) Shardiya Navratra, Autumn (September / October)
2) Vasantik Navratra, Spring i.e. Chaitra Shuddha Pratipada to Chaitra Navami (March / April)
3) Shakambhari Navratra, Magh Shukla Ashtami to Magh Pournima (January / February)
4) Gupta Navratra or Varahi Navratra, Ashadh Shuddha Pratipada to Ashadh Shuddha Navami (June / July)
5) Champashasthi Navaratra, Margashirsha Shuddha Pratipada to Margashirsha Shashti, The only Navratra of six days (November / December)

Out of all these Navratri, from Ashwin Shuddha Pratipada to Ashwin Shuddha Navami, the Shardiya Navratri festival is considered important among the devotees. Ashwin Shuddha Pratipada is performed in the house and the festival of the Goddess begins. Ghatsthapana is a small pot of soil spread in the middle by spreading soil on a foliage. The pot is filled with water by sowing saptadhanya in that soil. It is kept in a closed place and kept intact. A large stone or metal lamp is lit to keep the Nandadeep burning continuously for nine days and its wind is kept large enough to keep it burning for nine days so that the Nandadeep near the ghat is kept burning continuously and the Goddess is awakened. Every day Ghat is garlanded with flowers, morning and evening Aarti is called and in some houses, Saptashatipatha, Sreesukta, Lalita Sahasranamavali are recited, meditated and the deity is chanted.

Although ghatashthapana is traditionally practiced, it has a background in classical farming culture. It is a traditional but classical approach to seeding, water testing, soil testing, and climate testing.

What exactly do we do when we perform ghatashthapana?

First, the foliage of a palm leaf is kept. Black soil from the field is placed on it. Different types of seeds are mixed in this soil. A clay pot is placed on it. This drop is watered daily for nine days. On the ninth day, the palm leaf is lifted and the fall is immersed.

From a scientific point of view, the reduction is established on the last day of the rainy season and before the start of the rabbi harvest season. The soil used for ghata is black soil from the field. This soil is not taken from someone else’s field but from the farmer’s own field or in the field where he is going to grow rabbi. Because this is a test of the soil in the field where he is going to harvest.

The seeds mixed in this soil are not used at all, but only the crop that the farmer can sow in his field during rabbi season and the seeds available to him are sown in the field. The purpose behind that is to check the germination capacity of the seed used in his field.

The water that is added to the ghat for nine days is used to irrigate the ghat from the same water source that the farmer is going to use for his field. Ghat is used only for earthen and raw baked goods. Other metal can not use for ghat. This is because the water poured into the ghat needs to be constantly leaked so that it is available for germination in the cone-shaped soil and the seeds planted in it. The fact that we have only nine days of germination takes eight days for the seeds to germinate.

The germination capacity of seeds in Ghats is checked daily. On the ninth day, the palm leaf is picked up by five, seven or eleven people from the village. Tali means a plate of coconuts, bhandara and grains and Sadananda’s Yelkot, Bhairavnath’s Changbhale, Ambabai’s Udo Udo are spoken aloud. The purpose of this is to inspect the crop that has grown in the fall, but the scientific view is that the crop that has just arrived is a process of unanimous selection for sowing in the field. This unanimous decision is accepted by all by announcing Changbhal, Yelkot.

The universal crop is uprooted by Udo Udo. The stalk of this uprooted crop is plowed by the farmer into the cap of his hat or feta or tied with a ring. They all come to the village at an ancient temple outside the village gate to loot the shillingna . This method makes it easier to study the results of home-based tests. The crop water in the village shivara is planned on the same day by gathering in the public places of the village. In all these processes, like soil, water and seed testing, this year’s climate is also tested to see which crop is nutritious.

Dussehra is celebrated with great enthusiasm after the harvest is decided during the rabbi season. This shows how noble it was for everyone to decide what crop to grow in their field during the upcoming rabbi season, and how noble it was to conceive of how the crop would grow.

It is necessary to cultivate this traditional but scientific method of treatment, which is used to get maximum yield by treating the soil of my farm, the seeds available to me, the water available to my farm, which crop is nutritious for this year’s climate.

Not only the practices and traditions of our Hindu religion, but also the practice of scientific method was behind each of those practices and traditions. It is important to realize that this is a rich heritage for our agrarian country, which has the role of unanimously selecting a good crop and cultivating it more naturally than modern method.

Categories
Read more