100% FREE Shipping all across India

Ganesh Chathurthi – offering of 21 medicinal leaves called Patri

Ganesh Chathurthi – offering of 21 medicinal leaves called Patri

 Shri Ganesha Utsav is a festival celebrated all over India, especially in Maharashtra.

Shri Ganesh is the deity of Hindus! Ganeshotsav, which falls on Shuddha Chaturthi in the month of Bhadrapad, is still celebrated by Hindus with great joy, enthusiasm and vigor. Since Ganapati is the deity of intellect and it is customary to worship him first in every function, there is a feeling of respect for this Ganesha in every Hindu heart.

Coming from house to house and Public places, this Bappa brings an atmosphere of joy and excitement everywhere. Preparations begin many days before his arrival. Everyone worships him according to their tradition. Ganapatibappa comes somewhere for a whole ten days, somewhere for five days, somewhere for a day and a half and somewhere even for a day.

While pratisthapana (installing) Lord Ganesha, it is customary to offering pujan, abhishek, attar flowers and offering Durva Patri and at the end Aarti by invoking the earthly idol,

Even during Ganesha worship, 21 types of leaves flow called patri. This is the scientific approach of the ancestors behind the practice. After thousands of years of observation and research, it is clear that the main purpose of this ritual is to pass on the knowledge of medicine to the next generation without any hesitation. As it is a rainy day in the month of Bhadrapad, various plants are grown everywhere. Among them, the practice of offering these 21 different types of leaves to Lord Ganesha introduces the foresight of our ancestors.

Ganesh Chathurthi or The story of Ganesh’s birth:
According to the Puranas, when Mother Parvati was about to go for a bath, as there was no guard outside, she made a clay idol and breathed life into it. Lord Shankar came out. When the guard stopped him, he angrily beheaded him. She was very angry and furious with what happened after Mother Parvati came out of the bath.To quell her anger, Lord Shiva asked his sevaks to bring the head of the first person they saw. When the sevaka brought the elephant’s head, the head was placed on the trunk. That day was the day of Shuddha Chaturthi in the month of Bhadrapad and from then on the practice of celebrating Shri Ganesha Utsav started.

In Maharashtra, Lokmanya Bal Gangadhar Tilak chose Ganesha as a means of public awareness and to promote a sense of unity in the society and gave Ganeshotsav a comprehensive, public and enlightening form. The public Ganeshotsav was started to bring Indians together and exchange ideas. The purpose of starting the public Ganeshotsav was to create awareness in the society and increase the participation of common peoples in the festival which is confined to houses only. Due to this Ganeshotsav, programs were held with the aim of increasing the sense of national unity along with religious tendencies. The experience of the last sixty-seven years shows that the preservation of the national tendency has been nurtured through this public celebration. The public awareness work done by the public Ganeshotsav in the freedom movement of India is remarkable.

The public Ganeshotsav started in Pune and gradually it started being celebrated all over Maharashtra. Apart from Maharashtra, Ganeshotsav celebrations are on the rise in other states like Delhi, Calcutta, Goa and Madras.

On the occasion of Ganeshotsav, in many places, cultural programs, health camps, lectures, various types of decorations, social information and social programs are also organized.

तपशील मराठी मध्ये

श्रीगणेश उत्सव हा अवघ्या भारतभर विशेषतः महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होणारा सण आहे.
श्री गणेश म्हणजे हिंदु धर्मीयांची आराध्यदेवता! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात. गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे.
घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते. प्रत्येक जण आपल्या पंरपंरेप्रमाणे त्याची पुजा अर्चना करतात. गणपतीबाप्पा कुठे संपुर्ण दहा दिवस, कुठे पाच दिवस, कुठे दिड दिवस तर कुठे अगदी एक दिवसाकरीता देखील येतो.
श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतांना पार्थिव मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर फुलं दुर्वा पत्री अर्पण करून अखेर नैवेद्य दाखवून आरती करणे अशी प्रथा आहे.
गणेश पूजनादरम्यानसुद्धा २१ प्रकारच्या पत्री वाहतात. या प्रथेमागे पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मानवाच्या सभोवताली असणार्या निसर्गामधील अनमोल औषधी-खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू डोळ्यांसमोर ठेवूनच गणेशचतुर्थीसारख्या सर्वप्रिय सणावेळी पत्री वाहण्याची प्रथा पूर्वजांनी सुरू केली आहे. हजारो वर्षांच्या निरीक्षण व संशोधनानंतर मिळालेले औषधी-ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही विनासायास मिळावे हा महत्त्वाचा हेतू या पत्री वाहाण्यामागे आहे, हे उघड आहे. भाद्रपद महिन्यात पावसाचे दिवस असल्याने सगळीकडे विविध वनस्पती उगवलेल्या असतात. त्यामधीलच या विविध 21 प्रकारच्या पत्री श्री गणेशाला अर्पण करण्याची प्रथा आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीचा परिचय देतो.

१. अगस्ती(हादगा) अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने (Sesbania Grandiflors). प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व ‘अ’ हे दृष्टीला पोषक असतेत्या जीवनसत्त्वाचे वनस्पतिज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.

Agastya (Hadaga) Agastya means Sesbania Grandiflors. Agastya’s experiments on eye disorders are found in ancient texts. The botanical form of vitamin A, which is nutritious for vitamin A, is beta-carotene, which is found in a huge amount of 45,000 UG in Agusti leaves, which is much higher than carrots.

२. अर्जुन-अर्जुनपत्रे (Terminallia Arjuna). अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. ‘अर्जुनारिष्ट’ हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणार्या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.

Arjuna-Arjuna (Terminallia Arjuna). Arjuna this tree is famous for its heart-warming properties. ‘Arjunarishta’ is a famous heart medicine. Ayurveda believes that due to the abundant natural calcium in Arjuna, the consumption of Arjuna strengthens the bones like ivory.

३. आघाडा- अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera). आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.

Aaghada (Achyranthus Aspera). Many of the properties of this plant are especially useful for gynecologists.

४. कण्हेर-करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum). हिचा उपयोग तारतम्याने करतात, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.

Kanher-Karveer means Nerium Odorum. It is used sparingly, as Kanheri’s poisoning causes the heart and respiratory system to shut down and the mouth to go crooked.
५. केवडा-केवड्याची पाने. (PendenusTectoritus). केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.

Kevada-Kevada leaves. (PendenusTectoritus). Ghee prepared in Kevada flower juice is useful for urinary incontinence. Kevada is applied in chronic headaches or other venereal diseases.

६. जातिपत्र-जातिपत्रे अर्थात जाईची पाने (Jasminum Oriculatum). जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.

Jathi leaves – Jasminum oriculatum. Jai is ulcerative. An incurable ulcer (wound) is washed with the extract of these leaves, and the wound is healed by applying crushed leaves on the wound.
७. डाळिंब-दाडिमपत्रे अर्थात डाळिंबाची पाने (Punica Granatum). चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवर्मचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहीसा होतो. उपलब्ध औषधे: दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण. लहान मुलांना होणार्या जंत, जुलाब यांसारख्या आजारांमधील डाळिंबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे.

Pomegranate-Pomegranate leaves (Punica Granatum). Although sour in taste, selected bile-containing fruits include pomegranate with amla. Pomegranate is a curative medicine for intestinal diseases. Available medicines: Dadimavaleh, Dadimashtak powder. The usefulness of pomegranate in diseases like worms and diarrhoea in children is universal.
८. डोरली-बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने (Solanum Indicum). डोरलीसारखे रूप असणार्या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.

Dorley-leaflets are the leaves of Dorley (Solanum Indicum). Inhalation of Ringa (in marathi, english name unknown) fruits and seeds, which have the form of dorli, reduces tooth decay, toothache and stops tooth decay.
९. तुळस-तुळशीची पाने (Ocimum Sanctum), तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

Basil-Tulsi leaves (Ocimum Sanctum), the most famous property of Tulsi is that Tulsi is an effective medicine for cold-cough-fever. On rainy days, there should be basil in the house, so basil is useful for various ailments in those days. Applying basil juice on ringworm is beneficial.
१०.दूर्वा-दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.

Cynodon Dectylon. Ganapati is a radiant (hot) elemental deity and Durva is a major plant that quenches heat. Durva is one of the earliest medicinal plants in Ayurveda.
११.देवदार-चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा (Pinus Deodora) समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.

Pineus Deodora is one of the medicinal uses for many diseases in the cedar-charakasamhita. The cedar tree is also called Surdaru.
१२.धोत्रा-धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने (Datura Stramonium) हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.

Dhotura-Dhatturapatra is an effective medicine for respiratory diseases. But the toxic properties of dhotra are as useful as medicine only when used in proper-sufficient doses; Otherwise it can be fatal.
१३.पिंपळ-अश्वत्थ पत्रे अर्थात पिंपळाची पाने (Phycus Religiosa). पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणार्या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.

Pimple-Ashwattha leaves i.e. Pimple leaves (Phycus Religiosa). Pimpal is a very ancient tree in India; References to which can be found not only in Ayurveda but also in Rigveda. The planting and preservation of trees like Pimpal, which take care of the health of the entire community, is commemorated on the occasion of Ganesha Puja.
१४.बेल-बेलाची पाने (Aegle Marmelos. बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.

Bell-bella leaves (Aegle Marmelos. Bilwa) This plant is an excellent remedy for intestinal ailments.
१५.बोर-बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने (Zizyphus Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.

Bor-Badripatra is the leaf of Bor (Zizyphus vulgaris). Bora seed powder taken with water reduces the disease of eating. Bora leaf chutney taken with rice kanji reduces obesity.
१६.मरवा-मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने (Origanum Margorana). मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणार्या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणार्या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेद म्हणतो.

Origanum margorana. Marwa is very fragrant. Ayurveda says that there is no easier way to stimulate the pituitary gland than the natural fragrance, which is considered to be the queen of all the endocrine glands that produce hormones that play an important role in the functioning of the body.
१७.मधुमालती-मधुमालती म्हणजे मालती (शास्त्रीय नाव – Jasminum Grandiflorum). ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.

Madhumalati-Madhumalati means Malati (classical name – Jasminum Grandiflorum). This leaf is mainly useful for oral diseases.
१८.माका-भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे ‘केश्य गुणधर्म’. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.

Maca-beetle leaves (Eclipta alba) An important use of maca is ‘Keshya Gunadharma’. It is useful for both hair growth and color.
१९.रुई-अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. (Calotropis procera.) रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.

Rui-extracts are the leaves of Rui. (Calotropis procera.) Rui is an excellent expectorant. It is a drug that stimulates various glands in the body as a whole and improves their function and alternatively heals the body’s metabolism.
२०.विष्णुक्रान्ता-विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी (Evolvulus Alsinoides). बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.

Vishnukranta-Vishnukranta means conch flower (Evolvulus Alsinoides). Well-known as a brain-memory enhancer, this conch removes the obstruction of the brain.
२१.शमी-शमीची पाने (Prosopis Spicigera). शमी हा शब्द ‘शमयति रोगान् इति’ म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.

Shami-Shami leaves (Prosopis Spicigera). The word shami ‘shamayati rogan iti’ means the shami that alleviates diseases.

गणेशजन्माची कथा :
पुराणातील माहितीनुसार माता पार्वतीला एकदा स्नानाकरता जायचे असतांना बाहेर कुणी पहारेकरी नसल्याने तिने मातीची एक मुर्ती बनवुन त्यात प्राण फुंकले त्याला पहारेकरी नेमुन ती स्नानाला गेली असता बाहेर भगवान शंकर आले.पहारेकऱ्याने त्यांना रोखले असता त्यांनी संतापुन त्याचा शिरच्छेद केला. माता पार्वती स्नानाहुन आल्यानंतर झालेल्या प्रकाराने ती प्रचंड संतापली आणि क्रोधीत झाली. तिचा क्रोध शांत करण्याकरता भगवान शंकराने आपल्या सेवकांना प्रथम जे कोणी दिसेल त्याचे शिर आणावयास सांगितले सेवक हत्तीचे शिर घेऊन आले असता ते शिर त्या धडावर बसविण्यात आले.तो दिवस भाद्रपद महिन्यातला शुध्द चतुर्थीचा दिवस होता आणि तेंव्हापासुन श्री गणेशाचा उत्सवाची प्रथा सुरू झाली.

महाराष्ट्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी लोकजागृतीचे एक साधन म्हणून आणि समाजातील ऐक्याची भावना वाढावी या हेतूने गणपती या उपास्यदेवतेची निवड केली आणि गणेशोत्सवाला व्यापक, सार्वजनिक व ज्ञानसत्रात्मक स्वरूप दिले. भारतीयांना एकत्र आणण्याकरीता आणि विचारांची देवाणघेवाण करण्याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली गेली. समाजात जनजागृती होऊन केवळ घरांपुरता बंदिस्त असलेला उत्सवामध्ये बहुजनांचा सहभाग वाढावा हा उद्देश सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागे होता. या गणेशोत्सवामुळे नकळत धार्मिक प्रवृत्तीबरोबर राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी, या उद्देशाने कार्यक्रम होत असत. गेल्या साठसत्तर वर्षांच्या अनुभवावरून राष्ट्रीय प्रवृत्तीची जोपासना या सार्वजनिक उत्सवाच्या द्वारे होत गेली, असे दिसून येते. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात सार्वजनिक गणेशोत्सवाने केलेले लोकजागृतीचे कार्य उल्लेखनीय ठरते.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात झाली व हळूहळू तो महाराष्ट्रभर साजरा होऊ लागला. हल्ली महाराष्ट्राबाहेर दिल्ली, कलकत्ता, गोवा, मद्रास यांसारख्या इतर प्रांतांतही गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे.
गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, व्याख्याने, विविध प्रकारची आरास यामध्ये समाजपयोगी माहिती सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येतं.

Article by Rajesh Budage

India is culturally a diverse nation where festivals are celebrated throughout the year. Every celebration has a scientific relevance and meaning for people leaving in this land which connects them to the mother earth. So Ganesh Chaturthi is the one which invokes the intellect process within a human being to stay conscious and be aware of the surroundings that we live in.

Categories
Read more