100% FREE Shipping all across India

Diwali – symbol of victory of good overcoming evil

Diwali – symbol of victory of good overcoming evil

दिपावली

वाईट गोष्टींवर मात करुन चांगल्या गोष्टींच्या विजयाचे प्रतिक म्हणून दिपावली सण साजरा होतो. हा सण किमान 3 हजार वर्षे जुना आहे. प्रभू श्रीराम सीतेला घेऊन लंकेवरुन अयोध्येला परत आले तो दिवस अयोध्यावासीयांनी उत्साहात साजरा केला तो दिवाळीचा सण म्हणूनही रुढ झाला. दीप हा मांगल्याचे प्रतिम मानले जाते. त्याच्या प्रकाशाने जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळयातील समृध्दीचा, आनंद उत्सवाचा आणि कृतज्ञतेचा पारंपारिक सोहळा मानला जातो. “नीलमत पुराण” या ग्रंथात या सणाला ” दीपमाला” असे म्हटले असून ” ज्योतिष रत्नमाला ” या ग्रंथात ” दिवाळी” हया शब्दाचा उपयोग केला गेला आहे. आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दिपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक व सामाजिक महत्त्व आले आहे. यावेळी नवे धान्य तयार झालेले असते, म्हणून हा कृषिविषयक आंनदोत्सवही आहे.

Ram returns to Ayodhya - Diwali Celebration

आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावस्या (लक्ष्मीपूजन) आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः ते सण वेगवेगळे आहेत.

vasubaras

श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस ! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते.या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णूरूप पाहून जिवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्याे चैतन्यलहरींचा लाभ उठवायचा असतो. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.

गोस्तु मात्रा न विद्यते । – (यजुर्वेद, अध्याय २३, कण्डिका ४८)
अर्थ : गायीच्या माध्यमातून होणार्या् लाभांची इतर कोणत्याही पशूशी तुलना होऊ शकत नाही.
रक्षामि धेनुं नित्यं पालयामि धेनुं सदा ।ध्यायामिधेनुं सम्यक् वन्दे धेनुमातरम् ।।
अर्थ : आम्ही गोमातेचे नेहमी रक्षण करू. आम्ही नेहमी गोपालन करू. तसेच गोरक्षण, गोसंवर्धन आणि गोपालन यांविषयी सतत चिंतन करू. हे गोमाते, तुझ्या वंदनीय स्वरूपाला जनमानसांत पुन्हा प्रस्थापित करू.
अशा अर्थाने वसुबारस साजरी करण्यात येत असते.

आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणून ओळखले जाते. यमराजाने आपल्या दूतांना ‘या दिवशी जो दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार नाही , असे सांगितल्याची कथा आहे. म्हणून या दिवशी मंगलस्नान करुन दीप लावतात. यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावायचा असतो. इतर वेळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे अशुभ समजतात.
हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.Shubh-Dhanteras

narakchaturdashi

आश्विन वद्य चतुर्दशीस नरकचतुर्दशी म्हणून ओळखतात. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सुर्योदयापूर्वी परत आला. त्या वेळी त्यास मंगलस्नान घालून ओवाळण्यात आले. याची स्मृती म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान करून दिवे लावतात. व आनंदोत्सव साजरा करतात. सत्यभामेने श्रीकृष्णाच्या साहाय्याने नरकासुराला मारले अशीही एक कथा आहे.

आश्विन वद्य आमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन असते. या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतिक आहे. संयमपूर्वक धन संपादन केलं, तर तर मनुष्याचे कल्याण होते. यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते.या रात्रीची केवळ द्यूत खेळावे, असे सांगितले आहे. द्रव्य हे चंचल आहे, हे लक्षात येण्यासाठीच या खेळाची योजना असावी लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता मांगल्य, प्रकाश आढळेल तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्याची रोषणाई करतात. घरातील कचरा घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुणी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे.

lakshmi pujan

या दिवशी महावीरांचे निर्वाण झाले. म्हणून जैन लोक या दिवशी सर्वत्र दिवे लावून हा दिवस पाळतात. महावीरांचा प्रकाश सर्वत्र पसरावा हा उद्देश त्यामागे असावा.

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा म्हणून ओळखले जाते. या दिवशी विष्णूने वामनावतार घेऊन बळिराजाला पाताळात लोटले. या दिवशी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, असा वामनाने बळीला वर दिला. या दिवशी बलिपूजा करण्याचीही पद्धत आहे. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. या दिवसापासून विक्रम संवत सूरू होतो. म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे.
या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. हा दिवाळीचा मुख्य दिवस मानतात. दिवाळी हा सण मुळात अ-नागर संस्कृतीतून, कृषीसंस्कृतीतून फुललेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थच साजरा केला जातो. बळीराजा बहुजनांचा देव मानला जातो. दीन दीन दिवाळी गाई म्हशी ओवाळी या लोकगीतातून दिवाळी हा सणच शेतकऱ्यांचा आहे, याची आठवण येते.शेतकरी या दिवशी घराला, गोठ्याला झेंडूच्या माळा लावून सजवतो. गुरांना ओवाळतो. त्यांना गोडधोड घालतो. नेहमीच्या गुराख्याला आणि स्त्रियांना गोठ्यातील कामापासून सुट्टी दिली जाते. धनगर समाजात हा दिवस त्यांच्या मेंढ्यांच्या कौतुकाचा सण. मेंढ्यांच्या विविध स्पर्धा घेतात. मेंढा-मेंढीचे लग्न या दिवशी लावतात. त्यासाठी मेंढा-मेंढीला विशेष सजवले जाते. मेंढीच्या गळ्यात हळकुंडाचा गोफ बांधतात, तर मेंढ्याच्या गळ्यात पानसुपारीचा गोफ. खंडोबा-बिरोबाची गाणी म्हणत त्यांचे लग्न लावलें जातें. आदिवासी समाज आपल्या गुरांच्या-बकऱ्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा करतात. ते निवडुंगाचे काप करून त्याच्यात दिवे पाजळतात. बलिप्रतिपदेचा दिवशी आदिवासी आपले गोधन एकत्र करतात आणि गावाबाहेर नेतात. गावाबाहेर त्यांनी आधीच एक आखाडा तयार केलेला असतो. त्या आखाड्यात गवत पेटवून ते धूर करतात आणि त्या धुरातून गाय – बकऱ्यांना बळीराजाच्या नावाने पळवत नेतात. या धुरातून गोधन नेल्यावर त्यांना कसलाही आजार होत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे. याला आदिवासी ‘ढोर उठवणे’ असे म्हणतात.

balipratipada

happy-bhai-dooj

कार्तीक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी करतात. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला `यमद्वितिया` असेही म्हटले जाते. द्वितियेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो`, अशी यामागची भावना आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया दूर करून सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत व्हावी याकरिता हा भाऊबीजेच्या सण. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिन. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ ओवाळणीच्या ताटात `ओवाळणी` देऊन बहिणीचा आदरसत्कार करतो.

या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका ,लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. भारताबरोबरच, गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते.

Diwali is celebrated as a symbol of victory of good overcoming evil. This festival is at least 3000 years old. The day Lord Shriram returned to Ayodhya from Lanka with Sita was celebrated by the people of Ayodhya with enthusiasm. It also became a festival of Diwali. Deep is considered to be the image of Mangalya. Dipotsav is celebrated to dispel the darkness of life with its light. The rainy season is considered a traditional celebration of prosperity, joy and gratitude. The festival is called “Deepmala” in the book “Neelmat Purana” and the word “Diwali” is used in the book “Jyotish Ratnamala”. Since Ashwin Vadya Trayodashi to Kartik Shuddha Dwitiya are celebrated every day, they celebrate this festival by lighting lamps on all the five days. That is why this festival is known as Deepawali or Diwali. The festival has religious and social significance as the rainy season ends and autumn begins. New grain is produced at this time, so it is also an agricultural festival.

Diwali is celebrated for four days on Ashwin Vadya Trayodashi (Dhantrayodashi), Ashwin Vadya Chaturdashi (Narak Chaturdashi), Amavasya (Lakshmi pujan) and Kartik Shuddha Pratipada (Bali Pratipada). Some people do not consider Trayodashi as Diwali, but Diwali as the remaining three days. Vasubaras and Bhaubij are associated with Diwali, so they are included in Diwali; But in reality those festivals are different.

Vasubaras is the day when the catastrophic waves of Lord Vishnu are working and coming into the universe! On this day, Vasadavatta from Vishnuloka, Kamadhenu, works tirelessly to carry the waves to the universe. On this day, Kamadhenu is gratefully remembered and Dhenu, i.e. cow, is worshiped in the courtyard with Tulshi Vrindavana. That is why this day is called Vasubaras. Baras means the formation of a new seed of consciousness in something. It is this divinity that the soul wants to perpetuate by seeing the form of Vishnu permanently in it and to take advantage of the consciousness waves emanating from it. On this day, fortunately, the women remain united and worship the cow in the morning or in the evening.
गोस्तु मात्रा न विद्यते । – (यजुर्वेद, अध्याय २३, कण्डिका ४८)

Meaning: The benefits of cows cannot be compared to any other animal.
रक्षामि धेनुं नित्यं पालयामि धेनुं सदा ।ध्यायामिधेनुं सम्यक् वन्दे धेनुमातरम् ।।
Meaning: We will always protect Gomate. We will always take care of Gopalan. We will also constantly think about cow protection, cow rearing and Gopalan. O Gomate, let us re-establish your venerable form in the minds of the people.

In this sense Vasubaras is celebrated.

Ashvin Vadya Trayodashi is known as Dhantrayodashi. There is a story that Yamaraja told his angels that ‘whoever lights a lamp on this day will not die’. So on this day, they take a bath and light a lamp. For Yamaraja, the lamp has to be lit on the same day facing south. At other times it is considered inauspicious to light a lamp facing south.

This day is also celebrated as National Ayurveda Day in India.

Ashwin Vadya Chaturdashi is known as Narakchaturdashi. On this day, Krishna killed Narakasura and freed sixteen thousand women in his captivity. Krishna came back before sunrise with a drop of Narakasura’s blood. At that time, he was bathed and prayed. To commemorate this, they bathe before sunrise and light the lamps and celebrate. There is also a story that Satyabhama killed Narakasura with the help of Lord Krishna.

Lakshmi Pujan is performed on the night of Ashwin Vadya Amavasya. On this occasion, Ashta Dal worships Lakshmi by establishing her on the lotus. Lakshmi is a symbol of beauty, love and glory. If we acquire wealth with restraint, then there is welfare of man. For this, Dhanalakshmi has to be worshiped on this day. The game should be planned just to realize that matter is fickle. Lakshmi is circulating everywhere these days. It is believed that it resides where cleanliness is good and light is found. In some places, it is customary to worship broom as Lakshmi, which removes all household dirt.

On this day Mahavira attained Nirvana. Therefore, Jains observe this day by lighting lamps everywhere. The aim should be to spread the light of Mahavira everywhere.

Karthik Shuddha Pratipada is known as Balipratipada. On this day, Vishnu took Vamanavatar and threw Bali raja into the abyss. He will light the lamp on this day and he will not have to suffer Yamayatana, Vamana told the victim. There is also a method of sacrificing on this day. On this day King Vikram was enthroned. Vikram Samvat starts from this day. Hence it is called Diwali Padva. This is half of the three and a half auspicious moments of Hindus.

On this day the wife has a method of praying to the husband. The practice of worshiping Govardhan is also found in some places. This is considered to be the main day of Diwali. Diwali is basically a festival of non-urban culture, agro-culture. This day is very important in the life of farmers. This day is celebrated in the memory of Bali Raja. Bali raja is considered to be the god of many. “Deen Deen Diwali Gai Mhashi Ovali”, this folk song reminds that us that Diwali is a festival for farmers. On this day, farmers decorate their houses and barns with marigold garlands. Prays the cattle. Gives them sweet. The usual cowherd and women are given leave from work. In Dhangar Samaj, this day is a festival of appreciation for their sheep. Take various competitions of sheep. Sheep-sheep weddings are held on this day. For this, sheep and goats are specially decorated. A turmeric mala is tied around the neck of a sheep, while a mala of betel nut is tied around the neck of a sheep. They get married by singing Khandoba-Biroba songs. Tribal people worship their cattle and goats by placing garlands around their necks. They cut the cactus and light the lamps in it. On the day of Balipratipada, the tribals gather their cows and take them out of the village. He has already built an arena outside the village. They light the grass in the arena and smoke it. They make the cows and goats run through the smoke in the name of Bali raja. He believes that he does not get any disease after going from this smoke.

On the day of Karthik Shuddha Dwitiya, brothers and sisters celebrate this day. This day is also known as ‘Yamadvitiya’ as Yama went to eat at his sister Yami’s house. The moon on the second day is attractive and is considered as incremental. So, the feeling behind this is that brotherly love will continue to grow like the incremental moon. This is a festival of brotherhood to remove the hatred and envy in our minds and awaken the idea of brotherhood everywhere. On this day, the brother eats sweets at the sister’s house and in the evening, after seeing the crescent of the moon, the sister first prays to the crescent and then to the brother. The brother pays respect to his sister by giving her a gift.

The festival is now taking on a global dimension. Indians around the world celebrate Diwali in their respective cities. Diwali is also celebrated in London, USA. Along with India, Diwali is celebrated in Guyana, Trinidad and Tobago, Fiji, Malaysia, Myanmar, Mauritius, Sri Lanka, Singapore and Suriname.

Categories
Read more