100% FREE Shipping all across India

महाशिवरात्री

महाशिवरात्री

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्र असते. परंतु माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला जे शिवरात्र येते तिला महाशिवरात्री असे म्हणतात. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्व आहे, हे स्पष्ट होते. मध्यरात्र, वद्यपक्ष, शिशिर ऋतू, चतुर्दशी या महाशिवरात्रीच्या कालिक वैशिष्ट्यांमधून सृष्टीतील संहार व पुनर्निर्मिती यांचे चक्र सूचित होते, असे काही अभ्यासकांना वाटते.शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही.

त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.

शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून, त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इ. फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते.

महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून रहावे, चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प करावा आणि नंतर स्नान, शिवपूजा इ. द्वारे व्रत पूर्ण करावे, असे सांगितले जाते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत. रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा करावयाची असून तिला यमपूजा असे म्हटले जाते. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल, आंबा वगैरेंची पाने वाहिली जातात. विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते. सर्व वर्णांच्या व जातींच्या लोकांना हे व्रत करण्याचा अधिकार आहे. या काळात उपवास, जागरण वगैरे गोष्टी नकळत घडल्या तरी व्यक्तीचा उद्धार होतो, अशी लोकांची श्रद्धा असून ती सूचित करणाऱ्या अनेक कथाही प्रचलित आहेत. उदा., शिवरात्रीला नकळत उपवास घडल्यामुळे एका मृगाचा व व्याधाचा उद्धार झाला आणि त्यांना आकाशातील मृग व व्याध या नक्षत्रांचे रूप प्राप्त झाले. महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वरम्, गोकर्ण, वैजनाथ, शिखर-शिंगणापूर इ.असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिव ची की पूजा अर्चना करून दुसर्‍या दिवशी उपवास संपवतात.काही मंदिरांमध्ये भजन कीर्तन करून रात्रभर जागरण करतात.अशा प्रकारे संपूर्ण भारतात महाशिवरात्री साजरी केली जाते.महाशिवरात्रीला अध्यात्मिक दृष्ट्या सर्वाधिक महत्त्व आहे, कारण महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धा ची स्थिती अशी असते की त्यामुळे मनुष्याचा नैसर्गिक उद्रेक होण्याची शक्यता असते. नैसर्गिक ऊर्जेच्या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर उत्सव करून सगळेजण जागे राहतात, आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून रात्रभर न झोपता जागे राहतात.

‘नम: शिवाय’ हा शिवाचा पंचाक्षरी मंत्र आहे. त्यातल्या प्रत्येक अक्षराचा अर्थ जाणून घ्यायला हवा.                   

न = समस्त लोकांचा आदीदेव. म: = परमज्ञान देणारा आणि महापातकांचा नाश करणारा. शि = कल्याणकारी, शांत आणि शिवानुग्रहाला कारणीभूत असणारा. वा = वृषभवाहन, वासुकि, वामांगी, शक्ती यांचा सूचक. य = परमानंदरुप आणि शिवाचे शुभ असे वास्तव्यस्थान. अशा या शिवाला नमस्कार असो अशी या जपामागची भावना आहे. आपल्याकडे देवपूजेतल्या प्रत्येक कृतीला अर्थ आहे. पुजेच्या वेळी केला जाणारा प्राणायाम ङ्गुफ्ङ्गुसांची ताकद वाढवतो, रोगाला दूर ठेवतो तर ‘ॐ नम: शिवाय’सारख्या जपामुळे दीर्घश्‍वसन घडतं. तीर्थरूपात मिळणारं पंचामृत प्राशन केल्यामुळे त्यातल्या शरीराला उपकारक ठरणा-या दूध, मधासारख्या घटकांचा लाभ मिळतो.

पूजा-अर्चनेमुळे मन एकाग्र होतं. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात या मानसिक शांततेची खरी आवश्यकता आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही मन:शांती आवश्यक असते. आपल्याकडे मोठ्यांना नमस्कार करण्याची पद्धत आहे. ‘नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे  अशा तर्‍हेने त्यातून नम्रता तर दिसतेच, पण शरीरालाही एक प्रकारचा व्यायाम होतो. वाकल्यामुळे, मेंदूकडे जास्त रक्तपुरवठा होतो.

प्रत्येक सण वा उत्सव साजरा करण्यामागे काही ना काही पौराणिक कथा या असतातच, त्याप्रमाणेच महाशिवरात्रि सण साजरा करण्यामागे दोन पौराणिक कथा आहेत.

पहिल्या कथेनुसार, ज्यावेळी सागर मंथन झाले त्या वेळी संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. विश्वाची निर्मिती होत असताना समुद्रातून हलाहल विष देखील बाहेर आले. या हलाहल विष्या मध्ये संपूर्ण ब्रह्मांडाला नष्ट करण्याची शक्ती होती. कष्ट करण्याची ताकद केवळ भगवान शिवशंकर आणि मध्ये होती. त्यामुळे भगवान श्रीशंकर आणि हलाहल विषयाला प्राशन करून संपूर्ण ब्रह्मांडाला वाचवले. परंतु विष प्राशन केल्याने शिव शंकराचा कंठ निळा झाला, व त्यांचा संपूर्ण देह दाह करत होता. या वेळी एका वैद्याने भगवान शिवाला संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितले. त्यावेळी सर्व देवांनी मिळून भगवान शिवशंकर जागे‌ ठेवण्यासाठी नृत्याची आणि गायनाची व्यवस्था केली. विष पिल्याने संपूर्ण शरीरात दाह होत असल्याने भगवान शिवानी या दिवशी तांडव नृत्य केले.अशा प्रकारे भगवान शंकर संपूर्ण सृष्टीला वाचवले म्हणून या दिवशी महाशिवरात्री हा उत्सव साजरा केला जातो.

 दुसऱ्या कथेनुसार, एकदा पार्वतींनी भगवान कृष्णाला विचारले की, असे कोणते सोपे- सरळ व्रत आहे जे केल्यामुळे मृत्युलोकातील प्राण्यांवरही तुमची सहज कृपादृष्टी पडते. त्यावेळी भगवान शंकरांनी ‘महाशिवरात्री व्रताचा उल्लेख केला आणि माता पार्वतीला एका पारध्याची कथा सांगितली. चित्रभानू नावाचा एक पारधी होता. प्राण्याची शिकार करुन तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होता. शिकाऱ्याच्या डोक्यावर सावकाराचे मोठे कर्ज होते. जे कर्ज तो चुकवू शकत नव्हता. एके दिवशी कर्ज भरता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर सावकाराने त्याला एक शिवमंदिरात कोंडून ठेवले. तो दिवस शिवरात्रीचा होता. मंदिरात बसून तो भगवान शिवाविषयी अत्यंत धार्मिक गोष्टी मन लावून ऐकू लागला. दिवसभर उपवास घडल्यामुळे तो थोडा कमजोर झाला होता. संध्याकाळी शांत झाल्यानंतर सावकाराने त्याला कर्जाची रक्कम कधी देणार हे विचारण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्याने सगळे पैसे उद्या परत करतो असे सांगून शिकारीसाठी निघून गेला. थकून गेलेल्या पारध्याने सहज शिकार मिळवण्यासाठी तलावाकडील एका झाडावर जाऊन पाळत ठेवणे पसंत केले. हे झाड बेलाचे होते याची माहिती त्याला नव्हती. त्या झाडाच्या खाली एक शंकराची पिंड होती. शिकारीसाठी त्याने बेलाच्या काही फांद्या छाटल्या होत्या. त्या पिंडीवर जाऊन पडल्या आणि त्यामुळे शिकाऱ्याकडून न कळतपणे शिवलिंगावर अभिषेक झाला होता. दुसऱ्या दिवशी एक हरीण त्याला दिसले. प्रसुती काळ जवळ आलेले अशी ही हरीण होती. तिने शिकाऱ्याला पाहिले आणि सांगितले की, ‘मी आई होणार आहे. मला आता मारु नकोस. मला मारलेस तर तू दोन जीवांना मारशील. अशी चूक करु नकोस. हरीणीचे बोलणे ऐकून त्याने तिला सोडून दिले. त्यानंतर आणखी एक हरीण तेथे आली. तिने पारध्याला नेम घेताना पाहिले ती म्हणाली, मी विरहात आहे . मी माझ्या प्रेमाच्या शोधात आहे. मला आता जाऊ दे. मी नंतर तुझ्याकडे नक्की येईन.हे ऐकून शिकाऱ्याने त्या हरीणीलाही सोडून दिले. पण भुकेने व्याकुळ झालेल्या आणि कुटुंबाच्या चिंतेत असलेल्या शिकाऱ्याला पुढे काय करावे मुळीच कळत नव्हते. तो रागाने बेलाची पाने पिंडीवर टाकून लागला. तोच पुन्हा एकदा एक हरीणी तिच्या पिलांना घेऊन तळ्याकाठी आली. आता शिकार सोडायची नाही हा विचार करुन तो बाण मारणात तिच हरीणी म्हणाली की, मी या पिलांना त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करते. माझे कर्तव्य पूर्ण करते मग तू मला मार. उपवास, शिव पिंडीवर बेलाचा अभिषेक करुन पारध्याच्या मनात करुणाभाव आला होता. त्याने त्या आई हरीणीला सोडून दिले. पण सावकाराचे कर्ज आणि कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेत त्याने आता शिकार हातून जाऊ द्यायची नाही असे ठरवले आणि तो शिकार शोधू लागला. त्यावेळी तिथे एक तरणाबांड हरीण आला. आपल्यावर रोखलेला बाण पाहत तो म्हणाला की, हे शिकारी तू या आधी आलेल्या हरीणींना मारुन टाकले असेल तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. पण जर तू त्यांना मारले नसशील तर त्या माझ्या तीन पत्नी आहेत. मला त्यांना भेटण्याची गरज आहे. तू थोडा वेळा वाट बघं मी त्यांना भेटून लगेचच तुझ्याकडे येतो. यावेळी शिकारी थोडा कठोर झाला होता. पण त्याचा ह्रदयातून करुणा भाव जात नव्हता. त्याने त्या हरीणालाही जाऊ दिले. ज्यावेळी तो हरीण परत आला. त्यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पाहून त्यांना मारण्याची इच्छा मुळीच झाली नाही. स्वर्ग लोकातून सगळे देव पारध्यामधील बदल पाहात होते. त्याने सगळ्यांनी मन जिंकून घेतली. त्याच्यावर स्वर्गातून पुष्प वृष्टी होऊ लागली. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. या पारध्याकडून नकळत हे व्रत झाले आणि त्याला मोक्ष प्राप्ती झाली.

महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात.महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आवश्यक असलेली सामग्री म्हणजे, शिव शंकराची मूर्ती, रुद्राक्ष, बेलाची पाने ,धोत्र्याची फुले, पांढऱ्या फुलांचा हार इत्यादी गोष्टी आवश्यक असतात. अंन्न‌न खाता भक्त फक्त दूध किंवा फळे इत्यादी गोष्टी आहार करतात. दुधापासून बनवलेले पदार्थ भगवान शिव शंकराला नैवेद्य दाखवतात. नंतर तेच पदार्थ ग्रहण करतात.

महाशिवरात्रीला दूध, दही, तूप शेण आणि गोमूत्र असे न पंचगव्य वापरून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही ,तूप,मध आणि साखर हे पंचामृत वापरून शिवलिंगाला लेप देतात.त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने वापरून शिवलिंगाची पूजा करतात.

भारताचे विविध प्रांतातील महाशिवरात्री

दक्षिण भारत: दक्षिण भारतामध्ये महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या ठिकाणी  पहाटे स्नान करून शंकराचे दर्शन घेतात. तसेच भगवान शिवशंकर ला कमळाचे फूल अर्पण करून तांदुळाचे खीर करून नैवेद्य दाखवतात.तसेच ऋग्वेदातील सुक्तते सुद्धा म्हणतात. तसेच तुळशीची पाने शंकराला अर्पित करतात. त्याप्रमाणेच तीळ घातलेला भात, बेलाची पाने, निळ्या रंगाचे कमल फूल अर्पित करून सामवेदाचे पठण सुद्धा करतात.

 काश्मीर : काश्मीर मध्ये सुद्धा भाविक महाशिवरात्रि चा सण श्रद्धेने साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी कश्मीर मध्ये पडणारा बर्फाचा पाऊस हा शुभ आणि पवित्र मानला जातो. मंदिरामध्ये जाऊन भाविक शंकराचे दर्शन घेतात. शंकराला अक्रोड आणि कमळाची फुले अर्पित करतात.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा शिवरात्रीचा जल्लोष हा पाहायला मिळतो. उत्तर प्रदेश मध्ये स्थित असलेले वाटेश्वर या शंकराच्या मंदिरात महाशिवरात्री निमित्त राजस्थान, मध्यप्रदेश या भागातून भाविक दर्शनासाठी येतात. येताना पाण्याची कावड घेऊन येऊन  शिवा ला अभिषेक  घालतात.

 ईशान्य भारत : ईशान्य भारतातील आसाम या राज्यातील चक्रेश्वर मंदिर आणि उमानंद मंदिर  या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री दिवशी या मंदिराच्या ठिकाणी यात्रेचे आयोजन सुद्धा होते.

अशाप्रकारे भारतातील विविध प्रांतात महाशिवरात्रीचा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक सण-उत्सवातला पदार्थ हा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो. उपवास हा यामधला श्रद्धेचा भाग मानला जातो. यात आहारशास्त्राचा विचार केला असल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. कोणत्याही गोष्टीचा संबंध धर्माशी जोडल्यावर त्यातल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करणं सोपं जातं, हे ओळखून आपल्या पूर्वजांनी समाजहितकारक अशा अनेक गोष्टींचा धर्माशी समन्वय साधला. उदा. वृक्षपूजा, प्राण्यांना देव मानून पूजा करणं यामुळे आपोआपच निसर्गाचा समतोल राखला जाई. झाडे तोडणं, प्राण्यांना मारणं आदी कृत्यं रोखण्यासाठी पूर्वी कायदे करावे लागले नाहीत. निसर्गपूजेतून समाजाचा डोळस दृष्टिकोनच समोर आला आहे. पूर्वीच्या काळी निसर्गाच्या समतोलाविषयी पुरेशी काळजी घेतली जात असे. सध्या मात्र ही जाणीवच नाहीशी झाली आहे. त्यामुळे निसर्गाशी नव्याने जवळीक साधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी व्रतवैकल्याचा आधार मोलाचा आहे.

महाशिवरात्रीसारख्या अनेकविध सण उत्सवानिमित्त यात्रेच्या रुपाने अनेक लोक एकत्र येतात. त्यातून नवीन ओळखी होतात. दुर्मीळ होत असणारा सुसंवाद प्रस्थापित होण्यास ही एक चांगली संधी असते. यातूनच एकमेकांचं सुख-दु:ख कळतं, प्रेम वाढतं, सहकार्य वाढतं आणि त्याचा समाजाला ङ्गायदा होतो. सण-उत्सवानिमित्त आपण घर तर स्वच्छ करतोच, पण त्यातून परिसरही स्वच्छ होतो. दाराला लावलेलं तोरण, अंगणातली सुबक रांगोळी असं मंगलमय वातावरण निर्माण झाल्याने हे सण-उत्सव आपल्याला अपार आनंद देऊन जातात. समाजात एकोपा, बंधुभाव वाढीला लागणाच्या दृष्टीने उत्सवांचं महत्त्व मोठं आहे. समाजाच्या विविध घटकांमधली कटुता नाहीशी होऊन जगाला शांततेचा आणि एकतेचा संदेश देण्यासाठी पुरेसं बळ मिळावं, हीच प्रार्थना या महाशिवरात्रीच्या निमित्तानं भगवान शंकराकडे करू या.


Mahashivaratri

Shivaratra falls on Chaturdashi of Triodashi of Krishna Paksha of each month. But the Shivaratra which falls on Magh Krishna Chaturdashi in the month of Magh is called Mahashivaratri. If Chaturdashi is divided into two days, then the midnight which falls on Chaturdashi is considered as Shivaratra. From this it is clear that day is important, not day, when determining the time of Shivratri. From this it is clear that day is important, not day, when determining the time of Shivratri. Some scholars think that the cycle of destruction and re-creation in the universe is indicated by the temporal features of Mahashivaratri, such as Midnight, Vadyapaksha, Shishir Ritu, Chaturdashi. Shiva's Samadhi-stage is the time when Shiva performs sadhana for himself. At that time, Tamogun in the world did not accept Shivatattva. Therefore, the proportion of Tamoguna or the pressure of evil forces in the universe increases tremendously. We should fast on Mahashivaratri to attract Shivatattva so that it does not affect us.

A vow that is very sacred to Shiva devotees. In that sense, the night of Vadya Chaturdashi of each month is considered as Shivratri; But the night of Magh Vadya Chaturdashi is also known as Mahashivaratra. Shiva devotees believe that fruits are obtained.

A detailed discussion on how to fast Mahashivaratri can be found in various texts. Magh Vadya Triodashi should be eaten for a while, on the day of Chaturdashi one should make vows in the morning and then take bath, Shiva Puja etc. It is said to complete the fast by. Fasting, Pooja and Jagran are the three major parts of this vrata. Shiva is worshiped in different ways in each of the four Prahars of the night and is called Yampuja. During pooja, leaves of bell, mango etc. are offered to Shiva as a special darling. It can be observed after fasting for certain years. People of all castes and creeds have the right to make this vow. During this time, people believe that fasting, awakening, etc., even if it happens unknowingly, a person is saved, and there are many stories that suggest this. For example, due to unknowing fasting on Shivratri, a deer and a deer were rescued and they got the form of deer and deer constellation in the sky. On Mahashivaratri, pilgrims from Kashi, Rameshwaram, Gokarna, Vaijnath, Shikhar-Shinganapur, etc., travel to India.                On the day of Mahashivaratri, all Hindu brothers fast. They end their fast on the next day by worshiping Lord Shiva. In some temples, they wake up all night by chanting hymns. This is how Mahashivaratri is celebrated all over India. Natural outbreaks are more likely to occur. To give the right direction to the natural energy outbreak, everyone stays up all night celebrating, keeping their backs straight and staying awake all night.

‘Nama: Shivaya’ is the Panchakshari mantra of Shiva. You need to know the meaning of each letter.N = the ancestor of all people. M: = Giver of wisdom and destroyer of great sins. Shi = welfare, calm and cause Shivanugraha. Va = indicative of Taurus, Vasuki, Vamangi, Shakti. Y = blissful and auspicious abode of Shiva. The feeling behind this Japa is to greet such Shiva. We have meaning in every act of worship. Pranayama performed during puja increases the strength of Ngufungus, keeps away the disease, while chanting like 'Om Nam: Shivaya' causes shortness of breath. Practicing Panchamrut as a pilgrimage gives the benefit of ingredients like milk and honey which are beneficial to the body.

 Pooja-archane makes the mind concentrated. There is a real need for peace of mind in today's stressful life. Peace of mind is also essential for good health. We have a way of greeting adults. ‘Namaskare leenata ghade, namaskare vikalpa mode, it shows humility, but it also gives a kind of exercise to the body. Bending causes more blood supply to the brain.

There are some myths behind celebrating every festival or festival, similarly there are two myths behind celebrating Mahashivaratri.

According to the first story, the whole universe was created when the ocean churned. Halahal poison also came out of the sea while the universe was being formed. This halal subject had the power to destroy the entire universe. The strength to work was only in Lord Shiva and in. So Lord Sreesankar and Halahal saved the entire universe by prashan the subject. But after consuming the poison, Shiva Shankara's throat turned blue, and his whole body was burning. At this time, a doctor suggested to Lord Shiva to stay awake all night. At that time all the gods together arranged dance and singing to keep Lord Shiva Shankar awake. Lord Shiva performed Tandava dance on this day as the whole body gets inflamed by drinking poison.

According to another story, Parvati once asked Lord Krishna, what is this simple-straight vow that makes your graceful eyes fall on the creatures of the underworld. At that time Lord Shiva mentioned ‘Mahashivaratri Vrata’ and told the story of a Pardhya to Mother Parvati. There was a passerby named Chitrabhanu. He was raising his family by hunting animals. The hunter had a huge debt on his head. The debt he could not repay. One day, realizing that he could not pay the debt, the moneylender locked him in a Shiva temple. That day was Shivratri. Sitting in the temple, he began to listen to very religious things about Lord Shiva. He was a little weak from fasting all day. When the evening calmed down, the moneylender called to ask him when he would repay the loan. At that time, he left for the hunt, saying that he would return all the money tomorrow. Exhausted, Pardhya preferred to go and watch over a tree near the lake for easy hunting. He did not know that the tree belonged to Bella. Beneath that tree was a lump of Shiva. He had cut off some of Bella's branches for the hunter. She fell on the pindi and was anointed on the Shivling without the knowledge of the hunter. The next day he saw a deer. It was a deer that was about to give birth. She looked at the hunter and said, ‘I am going to be a mother. Don't kill me now If you kill me, you will kill two souls. Don't make that mistake. When he heard the deer talking, he let her go. Then another deer came there. When she saw Pardha taking aim, she said, "I am in despair." I am in search of my love. Let me go now. I will definitely come to you later. Hearing this, the hunter released the deer too. But the hunter, disturbed by hunger and worried about his family, did not know what to do next. He angrily threw Bella's leaves on the pindi. Once again a deer came to the pond with her cubs. Thinking that he would not let go of the prey, the deer shot the arrow and said, "I hand over these piglets to their father." Fulfills my duty then you hit me. After fasting and anointing Bella on Shiva Pindi, Pardhya felt compassion. He left the mother deer. But considering the debtor's debt and family responsibilities, he decided not to let the prey get out of hand and started looking for the prey. At that time a young deer came there. Looking at the arrow aimed at him, he said, "If this hunter had killed the deer that came before you, my life would have no meaning." But if you don't kill them, they are my three wives. I need to meet them. Wait a minute, I will meet them and come to you immediately. This time the hunter was a little stiff. But compassion did not leave his heart. He let the deer go too. By the time the deer returned. At that time, seeing his whole family, he did not want to kill them at all. All the gods from heaven were watching the transformation. He won the hearts of all. Flowers rained down on him from heaven. Lord Shankara was pleased with him. Unbeknownst to this Pardhya, this vow was made and he attained salvation.

Devotees fast with great devotion throughout the day on the day of Mahashivaratri. Devotees who eat food only eat milk or fruits. Foods made from milk are offered to Lord Shiva. Then they take the same food.

On Mahashivaratri, Shivlinga is anointed using Panchagavya without milk, curd, ghee dung and cow urine. Then milk, curd, ghee, honey and sugar are applied to the Shivlinga using Panchamrut. After that Dhotra and Bella leaves are used to worship the Shivlinga.

Mahashivaratri in various parts of India :

South India: In South India, the festival of Mahashivaratri is celebrated with great enthusiasm and joy. In this place, they bathe in the morning and pay obeisance to Lord Shiva. They also offer lotus flowers to Lord Shiva and offer kheer of rice. Also called suktate in Rigveda. They also offer basil leaves to Lord Shiva. They also recite Samaveda by offering sesame seeds, bella leaves and blue lotus flowers.

Kashmir: Devotees in Kashmir also celebrate Mahashivaratri with reverence. Snowfall in Kashmir on the day of Mahashivaratri is considered auspicious and sacred. Devotees go to the temple and pay obeisance to Lord Shiva. Walnuts and lotus flowers are offered to Lord Shiva.

Uttar Pradesh: Even in Uttar Pradesh, Shivratri celebrations can be seen. Devotees from Rajasthan and Madhya Pradesh visit the temple of Lord Shiva at Vateshwar in Uttar Pradesh on the occasion of Mahashivaratri. When they come, they bring water and anoint Shiva.

Northeast India: Devotees visit the Chakreshwar Temple and Umananda Temple in the northeastern Indian state of Assam. On the day of Mahashivaratri, a yatra is also organized at the place of this temple.

Thus Mahashivaratri is celebrated with great joy and enthusiasm in various parts of India. Every festival has its own unique and specialty. Fasting is considered to be a part of this faith. It also helps in maintaining good health. Recognizing that it is easier to assimilate the good things in religion when it is associated with religion, our forefathers coordinated many things that are socially beneficial with religion. E.g. Tree worship, worshiping animals as gods, automatically maintained the balance of nature. Laws have not been enacted in the past to prevent such acts as cutting down trees and killing animals. Nature worship has come to the fore in the eyes of the society. In the past, adequate care was taken for the balance of nature. At present, however, this awareness has disappeared. This has created a need for a new approach to nature. The basis of Vratvaikalya is valuable for this. Many people come together in the form of Yatra for various festivals like Mahashivaratri. It creates new identities. This is a great opportunity to establish a rare communication. It is through this that we know each other's joys and sorrows, love grows, cooperation grows and it benefits the society. We not only clean the house for the festival, but it also cleans the premises. These festivals give us immense joy as the toran attached to the door and the beautiful rangoli in the courtyard create a pleasant atmosphere. Celebrations are very important in terms of promoting unity and brotherhood in the society. Let us pray to Lord Shiva on the occasion of this Mahashivaratri that the bitterness between the various sections of the society will disappear and we will get enough strength to give the message of peace and unity to the world.

Categories
Read more